शेती रस्ता जमीन अर्ज तहसीलदार

माझ्या शेतामधून पूर्वी कोणताही रस्ता नव्हता किंबहुना तो सातबाऱ्यामध्ये सुद्धा नाही हे तरी पण एक व्यक्तीने रस्त्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज केलेला आहे. जर रस्ताच नसेल तर आम्ही शेतमधून रस्ता कसा देणार. जमिनीच्या बाजूने रस्ता आहे पण तो शेतामधून रस्ता मागतोय. सकारात्मक प्रतिसाद द्या काय करावे लागेल?

1 उत्तर
1 answers

10
नमस्कार, वहिवाट संबंधी जे वाद असतात ते मामलेदार म्हणजेच तहसीलदार यांचे कोर्टात चालत असतात, तुम्ही सांगितलेले प्रश्नाप्रमाणे जर तुमच्या शेता मधून रस्ता नसेल आणि एक व्यक्ती तशी मागणी तहसीलदार यांचे कोर्टात जाऊन करत असेल तर घाबरण्याचे कारण नाही
ज्यावेळी तहसीलदार जेव्हा पंचनामा करण्यासाठी प्रत्यक्षात येतील तेव्हा तुम्हाला तशी नोटीस येईल व तुम्ही सुद्धा कागदपत्र सहित हजर राहा व जे तुमचें  म्हणणे असेल ते नीट मांडा व गरज पडल्यास लेखी सुद्धा मांडा आणि जर तहसीलदार यांनी तुमचे विरुद्ध निर्णय दिल्यास व तुम्हाला मान्य नसल्यास तुम्ही प्रांत अधिकारी यांचेकडे अपिल दाखल करू शकतात.
उत्तर लिहिले · 15/9/2020
कर्म · 8355

Related Questions

पेरणीपूर्वी जमीन मशागतीच्या औजारांची यादी लिहुन कोणत्याही दोन औजारांची सविस्तर माहीती लिहा.?
वडील वारले तर वडीलांच्या नावावरची जमीन आईच्या नावावर करता येते का? त्यांना दोन मुली व चार मुले आहेत.
मागे आणि पुढे दोन तोंड असतात मला जमीन भुसभुशीत करण्याची माझी कलाशेतकऱ्यांच्या मित्र म्हणून ओळखतात मला ओळखा कोण?
तीन आकडी ७/१२ म्हणजे किती एकर जमीन?
वडिलांना 4 मुले असून त्यांना त्यांची जमीन विकू शकतात का?
महाराष्ट्रान किती टक्के जमीन शेतियोग्य आहे?
०.८१.०० म्हणजे किती गुंठे जमीन?