जिल्हा धरण

राधानगरी धरणाची माहिती द्या?

3 उत्तरे
3 answers

राधानगरी धरणाची माहिती द्या?

3
*🏪 राधानगरी धरण*








————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
भारतातील काही बड्या संस्थानिकांसह छत्रपती शाहू महाराज युरोप दौऱ्यावर गेले होते. https://bit.ly/4lsaZ38 महाराजांचा हा युरोप दौरा करवीर रियासतीच्या दृष्टीने आमूलाग्र क्रांतिकारक बदल घडवून आणणारा ठरला. महाराजांच्या सोबत असणारे इतर राजे-महाराजे सहलीचा आनंद उपभोगत होते तेव्हा हा रयतेचा राजा युरोपातील प्रगत तंत्रज्ञान, तेथील शेतीच्या पद्धती अशा मिळेल त्या गोष्टींचा अभ्यास करीत होता. या दौऱ्यात महाराजांनी रोमचे मैदान पाहिले यावरुनच महाराजांना खासबाग मैदान निर्माण करण्याची कल्पना सुचली. आज लाखो शेतकऱ्यांना "जीवन" देणारे व महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मितीचे एक महत्त्वाचे केंद्र असणारे "राधानगरी धरण" सुद्धा महाराजांच्या अशाच एक कल्पनेची परिणती ! 


 युरोप दौऱ्याहून परत आल्यानंतर युरोपमध्ये पाहिल्याप्रमाणे एक धरण आपल्या शेतकऱ्यांसाठीही बांधावे असे महाराजांना सतत वाटायचे. त्यानुसार महाराजांनी हालचाली सुरु केल्या. स्वतः संपूर्ण राज्यात फिरुन सर्व्हे केला व फेजिवडे गावानजिक भोगावती नदीवर धरण बांधण्याचे निश्चित केले. खास म्हैसूरहून सर एम. विश्वेश्वरैया यांना पाचारण करुन त्यांच्यापुढे ही योजना मांडली. त्यांनाही योजना व ठिकाण पसंत पडले. युरोपीयन धरणतज्ञांनी अकरा लाखांचे अंदाजपत्रक मांडले. लागलीच महाराजांनी १९०७ साली आपल्या पत्नी महाराणी लक्ष्मीबाई यांच्या हस्ते पायाखुदाईची कुदळ मारली.........
अनेक तज्ञ इंजिनियर्स, कुशल कारागीर असे दोन हजारहून अधिक लोक धरणबांधणीच्या कामाला लागले. या लोकांना राहण्यासाठी धरणालगतच महाराजांनी आपल्या मातोश्री राधाबाई यांच्या नावे "राधानगर" हे गाव वसवले
भारतात प्रथमच धरणबांधणीस सुरुवात होत होती मात्र धरणाचे काम सुरु असतानाच अचानक पहिल्या महायुद्धाचा भडका उडाला. युरोपातून येणारी सामुग्री खंडित झाली. महागाई गगनाला भिडली परिणामी धरणतज्ञांच्या मते अकरा लाख रुपयांत बांधून पूर्ण होणारे धरण १९१७ पर्यंत चौदा लाख रुपये खर्च झाले तरी निम्मे देखील बांधून झाले नाही. 𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫धरणाबरोबरच पुणे येथे शिवस्मारक, कोल्हापूर शहरात सुसज्ज नाट्यगृह, खासबाग मैदान, अतिग्रे, शिरोळ व पेठवड़गाव येथे तलाव बांधणी नद्यांवर बंधाऱ्यांची बांधणी अशी लाखो रुपयांची कामे सुरु होती. या कामांवर छत्रपतींचा संपूर्ण खजिना रिकामा झाला पण महाराजांना त्याची अजिबात काळजी नव्हती. माझा खजिना माझ्या शेतकऱ्यांसाठी उपयोगात येत नसेल तर त्याचा काय उपयोग असे महाराज नेहमी म्हणायचे मात्र १९१७ साली आर्थिक टंचाईमुळे महाराजांना धरणाचे काम बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला.
या गडबडीत नाट्यगृह, खासबाग मैदान, तलाव व बंधाऱ्यांची बांधणी अशी तुलनेने कमी खर्चिक कामे महाराजांनी पूर्ण केली. मात्र इतका आटापीटा करुन, आवाक्याबाहेर खर्च करुन, मानसिक व शारीरिक ताण सहन करुनदेखील महाराजांना धरण बांधल्याचे भाग्य दिसून येईना. राज्याचा संपूर्ण खजिना संपला तरी महाराजांचे स्वप्न असणारे राधानगरी धरण व पुणे येथील शिवस्मारकाचे काम पैशांअभावी रखडले. शिवस्मारक व धरण पूर्ण झाल्याचे पाहणे महाराजांच्या नशिबी नव्हते. ६ मे १९२२ रोजी महाराज शिवछत्रपतींच्या चरणी चिरनिद्रीस्त जाहले.
शाहू महाराजांनंतर त्यांचे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराज गादीवर आले. महाराजांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय राजाराम महाराजांनी केला. पुण्यातील शिवस्मारका बरोबरच १९१७ साली बंद पडलेल्या धरणाच्या कामास महाराजांनी पुन्हा सुरुवात केली. आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अफाट पैसा खर्च करुन महाराजांनी धरण बांधून पूर्ण केले. धरणाच्या जलाशयाला महाराणी लक्ष्मीसागर असे नाव दिले. आजतागायत राधानगरी धरण शाहू महाराजांच्या रयतेची अखंड सेवा करीत आहे. धरणामुळे ६० हजार हेक्टरहून अधिक जमिन ओलिताखाली आली आहे त्याचबरोबर राधानगरी धरण हे महाराष्ट्रातील प्रमुख ऊर्जानिर्मिती केंद्रांपैकी एक आहे. 
करवीर राज्याचा आकार व त्याकाळची आर्थिक कुवत लक्षात घेता छत्रपती शाहू महाराजांनी घेतलेल्या धरण बांधणीच्या निर्णयामधून महाराजांची दूरदृष्टी व महाराजांची रयतेप्रती असणारी निष्ठा प्रतीत होते. भारतातील काही स्वयंघोषित राजे -महाराजे स्वतःच्या अय्याशीसाठी व इंग्रजांची विशेष मर्जी राखण्यासाठी महागडे महाल बांधत होते, महागड्या विलायती गाड्या व चैनीच्या वस्तूंवर पैसे खर्च करीत होते, आपल्या संपत्तीची व इंग्रज दरबाराने आपल्याला दिलेल्या सन्मानाची मिजास मारत फिरत होते तेव्हा शाहू महाराज रयतेच्या कल्याणासाठी झुरत होते. छत्रपतींचा खजिना ही रयतेचीच संपत्ती मानून रयतेसाठी ती कारणी लावत होते म्हणूनच छत्रपती शाहू महाराज जगत् वंदनीय आहेत. राजेशाही धुडकावून "लोकशाही"चा अंगिकार केलेल्या भारताच्या सर्वोच्च सभागृहात पुतळा उभा आहे. ♏https://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24






2
राधानगरी धरण' कोल्हापूर जिल्ह्यातील एक धरण आहे. हे धरण भोगावती नदीवर बांधण्यात आले असून त्याचा उपयोग शेतीच्या पाणी पुरवठ्यासाठी व वीज निर्मितीसाठी होतो.

राजर्षी शाहूमहाराजांनी शंभर वर्षांपूर्वी सिंचनाचे महत्त्व ओळखून त्या कामाला सर्वाधिक प्राधान्य दिले. विहिरी, तलाव, छोटे बंधारे अशा अनेक योजनांचा धडाका लावला. राधानगरी धरण म्हणजे या प्रयत्‍नांच्या मालिकेतील मुकुटमणी आहे. एका छोट्या संस्थानाच्या बचतीमधून इ.स. १९०७ मध्ये महाराजांनी राधानगरी या धरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी धरणाची योजना पुढे आणली. ९ फेब्रुवारी १९०८ ला गाव नव्याने वसवून त्या गावाचे नाव "राधानगरी' ठेवण्यात आले. १९०९ मध्ये धरणाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले. १९१८ पर्यंत धरणाचे बांधकाम ४० फुटांपर्यंत पूर्ण झाले. पुढे निधीच्या कमतरतेमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास १९५७ साल उजाडले. पण तत्पूर्वी पाणी साठवणे सुरू झाले होते. महाराष्ट्रातील एक अतिशय भक्कम धरण म्हणून राधानगरी ओळखले जाते.

धरणाची माहिती
बांधण्याचा प्रकार : दगडी
उंची : ३८.41मीटर (सर्वोच्च)
लांबी : १०३७ मी्टर

दरवाजे
प्रकार : स्वयचलित
लांबी : १०६.६८ मीटर.
सर्वोच्च विसर्ग : सेकंदाला २८३ घनमीटर
संख्या व आकार : ७( १४.४८ X १.५२ मी)

पाणीसाठा

ओलिताखालील क्षेत्र
क्षेत्रफळ : १८.१३ चौरस कि.मी.
क्षमता : २३६८ लक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : २२०० लक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : १७२३ हेक्टर
ओलिताखालील गावे : ८

कालवा
या धरणातून कालवा काढण्यात आलेला नाही.

ओलिताखालील क्षेत्र : ५९११० हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ४७२८८ हेक्टर

वीज उत्पादन
जलप्रपाताची उंची : 27 मी
जास्तीतजास्त विसर्ग : २७.३० क्युमेक्स
निर्मिती क्षमता : ४.८ मेगा वॅट
विद्युत जनित्र : ४ X १.२ मेगा वॅट

उत्तर लिहिले · 12/10/2020
कर्म · 6750
0

राधानगरी धरण हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी तालुक्यात भोगावती नदीवर बांधलेले एक महत्त्वाचे धरण आहे. या धरणाची काही महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे:

इतिहास आणि बांधकाम:

  • राधानगरी धरण ब्रिटिश काळात बांधले गेले.
  • या धरणाचे बांधकाम 1907 मध्ये सुरू झाले आणि 1938 मध्ये पूर्ण झाले.
  • या धरणाचे मुख्य उद्दिष्ट कोल्हापूर संस्थानाला पाणीपुरवठा करणे आणि सिंचनाची सोय उपलब्ध करणे हा होता.

भौगोलिक माहिती:

  • हे धरण भोगावती नदीवर असून ते पश्चिम घाटाच्या परिसरात आहे.
  • धरणाची उंची 103.6 मीटर (340 फूट) आहे.
  • धरणाची लांबी 3,540 फूट (1,080 मीटर) आहे.

क्षमता आणि उपयोग:

  • राधानगरी धरणाची पाणी साठवण क्षमता 8.32 टीएमसी (अब्ज घन फूट) आहे.
  • या धरणातून कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय होते.
  • सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाते, ज्यामुळे शेतीला फायदा होतो.
  • या धरणावर जलविद्युत प्रकल्प (hydroelectric project) असून त्याद्वारे वीज उत्पादन देखील केले जाते.

पर्यटन:

  • राधानगरी धरण एक सुंदर पर्यटन स्थळ आहे.
  • धरणाच्याBackwaters ( Wasserflächen ) परिसरात अनेक पर्यटक भेट देतात.
  • जवळच दाजीपूर अभयारण्य ( Bison sanctuary ) असल्यामुळे पर्यटकांना वन्यजीव पाहण्याची संधी मिळते.

इतर माहिती:

  • राधानगरी धरणामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे, कारण यामुळे शेती आणि उद्योगधंदे विकसित झाले आहेत.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 840

Related Questions

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात स्वस्त नवीन मोबाईल कोठे मिळतो?
महाराष्ट्र जिल्हा परिषद केव्हा निर्माण झाली?
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा शाखा विस्तार काय आहे?
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कार्ये काय आहेत?
महाराष्ट्रातील कोणत्याही ५ राष्ट्रीय उद्यानांची नावे, विभाग, स्थळ, जिल्हा, सर्वसाधारण माहिती, तेथील पशू, प्राणी, फुले आणि त्यांची वैशिष्ट्ये सांगा.
महाराष्ट्रातील कोणत्याही ५ राष्ट्रीय उद्यानांची माहिती मिळवून त्यांची नावे, स्थळ, विभाग, जिल्हा, सर्वसाधारण पशू, प्राणी आणि फुले यांची वैशिष्ट्ये सादर करा.
जिल्हा सहकार मंडळे, व्याख्या?