संगणक भाषा
अल्गोरिदम
संगणक प्रणाली
संगणक विज्ञान
प्रोग्रामिंगमध्ये अल्गोरिदम म्हणजे काय, याचा काय फायदा होतो आणि हा तयार कसा करायचा?
2 उत्तरे
2
answers
प्रोग्रामिंगमध्ये अल्गोरिदम म्हणजे काय, याचा काय फायदा होतो आणि हा तयार कसा करायचा?
8
Answer link
Algorithm म्हणजे काय?
एखादे हाती घेतलेले काम पायरी पायरी ने सोडवण्यासाठी बनवलेला आराखडा.. स्टेप बाय स्टेप केलेले एखादे काम.
A step by step execution of program. जे प्रोग्राम असतात ते पायरी पायरी मिळून पुर्ण केलेले असतात.
उदाहरणार्थ :
चहा बनवायचा algorithm काय असेल?
Input : पाणी, चहा पावडर, दुध आणि साखर.
पायरी १ : गॕसवर लहान भांड्यात थोडं पाणी घेऊन त्याला उकळवा.
पायरी २ : मग आता त्यात दोन चमचे चहा पावडर टाका.
पायरी ३ : पाण्याला काळा तपकिरी रंग आला की थोडं दुध आणि गरजेपुरता साखर टाका.
पायरी ४ : थोडं उकळू दिल्यानंतर भांडे खाली उतरवावे नी गॕस बंद करावा.
Output : गरमागरम चहा.
हा झाला चहा बनवायचा algorithm. Algorithm हा step by step असतो हा. आपण पायरी ३ दुध टाकायची ती १ वर नाही करु शकतं.. पायरी १.२.३.४ असंच पुढे जायचं असतं.
Algorithm चा फायदा काय होतो?
वरील उदाहरण च पहा. कुठलीही गोष्ट स्टेप बाय स्टेप होते. आम्ही सरळ उठून थोबाडं घेऊन program नाही बनवतं.. अगोदर program चा algorithm बनवतो की सगळ्यांत पहिली पायरी आपली हीं, मग असं होईल, मग दुसरी ही.. हा असेल input आणि हा मिळेल output.
Algorithm मुळे काय करायचे, काय नाही करायचे, कधी करायचे सगळे कळते. आम्ही Program तुकडे तुकडे करून बनवतो नी मग त्यांना एकत्रितपणे जोडतो. त्यात Algorithm अतिशय महत्त्वाचा.
Algorithm कसा तयार करायचा?
सर्वप्रथम आपल्याला नक्की काय साध्य करायचं आहे ते निश्चित करावे.. मग आपला input काय असेल नी output काय असेल ते नीट ठरवायचे.
मग input वरून output मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या स्टेप्स एकामागे एक येईल अशा लिहाव्यात.
उदाहरणार्थ :
साध्य : मला मासे पकडायचे आहे.
input : तलाव, गांढूळ, आकडा.
पायरी १ : तलावात मस्त एका ठिकाणी शांत बसावे.
पायरी २ : आकडा काढावा नी त्यावर गांढूळ अडकवावे.
पायरी ३ : आता आकडा पाण्यात टाकावा नी वाट पाहावी.
पायरी ४ : जर गांढूळ अजूनही असेल तर आकडा तसाच ठेवावा नी वाट पहावी. जर गांढूळ नसेल तर परत पायरी २ करायची.
पायरी ५ : मासा सापडला तर वर खेचावे. टोपलीत टाकावा. अजून मासे हवे असतील तर परत पायरी १ सुरू करावी.
असं.. हे सगळ्यांत सोप्प आहे.
फुंसुख वांगडू.. Computer Science PhD. Scholar, IIT :-)

0
Answer link
अल्गोरिदम म्हणजे काय:
एल्गोरिदम म्हणजे विशिष्ट कार्य करण्यासाठी पायऱ्यांची क्रमवार मालिका. एल्गोरिदम एक गणितीय समस्या किंवा संगणकीय समस्या सोडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सूचनांचा एक मर्यादित संच आहे. एल्गोरिदम हा शब्द नवव्या शतकातील पर्शियन गणितज्ञ मुहम्मद इब्न मुसा अल-ख्वारिज्मी यांच्या नावावरून आला आहे.
अल्गोरिदमचे फायदे:
- अल्गोरिदम वापरून, एखादी समस्या कमी वेळात आणि कमी श्रमात सोडवता येते.
- अल्गोरिदम वापरून, प्रोग्राम अधिक वाचनीय आणि समजायला सोपा होतो.
- अल्गोरिदम वापरून, मोठ्या समस्यांचे लहान भागांमध्ये विभाजन करता येते, ज्यामुळे ते अधिक सोपे होतात.
- अल्गोरिदममुळे चुका कमी होतात आणि अचूकता वाढते.
अल्गोरिदम कसा तयार करायचा:
- समस्या समजून घ्या: अल्गोरिदम तयार करण्यापूर्वी, समस्या काय आहे आणि ती कशा प्रकारे सोडवायची आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.
- इनपुट आणि आउटपुट निश्चित करा: समस्येचे इनपुट (Input) काय असेल आणि आउटपुट (Output) काय अपेक्षित आहे, हे ठरवा.
- पायऱ्या लिहा: समस्येचे निराकरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायऱ्या क्रमवार लिहा.
- चाचणी करा: तयार केलेला अल्गोरिदम योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी त्याची चाचणी करा.
- सुधारा: आवश्यक असल्यास, अल्गोरिदममध्ये सुधारणा करा.
उदाहरण:
दोन संख्यांची बेरीज करण्यासाठी अल्गोरिदम:
- सुरुवात करा.
- पहिली संख्या (a) इनपुट म्हणून घ्या.
- दुसरी संख्या (b) इनपुट म्हणून घ्या.
- a आणि b ची बेरीज करा आणि उत्तर sum मध्ये साठवा.
- sum चे मूल्य दर्शवा.
- थांबा.