सात बारा
कागदपत्रे
प्रक्रिया
हक्क सोड पत्र कसे करावे आणि त्यासाठी ज्यांची नावे ७/१२ वरून काढावयाची आहेत, त्या सर्वांना रजिस्टर कार्यालयात हजर राहावे लागते का?
6 उत्तरे
6
answers
हक्क सोड पत्र कसे करावे आणि त्यासाठी ज्यांची नावे ७/१२ वरून काढावयाची आहेत, त्या सर्वांना रजिस्टर कार्यालयात हजर राहावे लागते का?
7
Answer link
हक्कसोडपत्र व त्यानंतरची वारस नोंद
हक्कसोडपत्र म्हणजे एकत्र कुटुंबातील कोणत्याही सदस्याने, सहहिस्सेदाराने, त्याचा त्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीवरील, स्वत:च्या हिस्स्याचा वैयक्तिक हक्क, त्याच एकत्र कुटुंबाच्या सदस्याच्या किंवा सहदायकाच्या लाभात, स्वेच्छेने आणि कायमस्वरुपी सोडून दिल्याबाबत नोंदणीकृत दस्त.
हक्कसोडपत्र कोणाला करता येते ?
एकत्र कुटुंबाचा कोणताही स्त्री अथवा पुरुष सदस्य, सहहिस्सेदार हक्कसोडपत्र करु शकतो. एकत्र कुटुंबाचा कोणताही स्त्री अथवा पुरुष सदस्य किंवा सहहिस्सेदार फक्त वारसहक्काने मिळालेल्या किंवा मिळू शकणार्या एकत्र कुटुंबातील मिळकतीतील स्वत:च्या हिस्स्याच्या मिळकतीपुरते हक्कसोडपत्र, त्याच एकत्र कुटुंबाच्या स्त्री अथवा पुरुष सदस्य किंवा सहहिस्सेदार यांच्या लाभात करु शकतो.
हक्कसोडपत्र कोणत्या मिळकतीचे करता येते ?
फक्त वारसहक्काने मिळालेल्या किंवा मिळू शकणार्या एकत्र कुटुंबातील मिळकतीतील स्वत:च्या हिस्स्याच्या मिळकतीपुरते हक्कसोडपत्र करता येते.
हक्कसोडपत्र कोणाच्या लाभात करता येते ?
फक्त त्याच एकत्र कुटुंबाच्या स्त्री अथवा पुरुष सदस्य किंवा सहहिस्सेदार यांच्या लाभात हक्कसोडपत्र करता येते. त्या एकत्र कुटुंबाचे सदस्य किंवा सहहिस्सेदार नसलेल्या व्यक्तीच्या लाभात झालेला दस्त हक्कसोडपत्र होत नाही. असा दस्त हस्तांतरणाचा दस्त म्हणून गृहीत धरला जातो व मुंबई मुद्रांक कायदा १९५८ मधील तरतुदींन्वये मूल्यांकनास व मुद्रांक शुल्कास पात्र ठरतो.
हक्कसोडपत्राचा मोबदला
सर्वसाधारणपणे हक्कसोडपत्र विनामोबदला केले जाते परंतू हक्कसोडपत्र हे मोबदल्यासह असू शकते. मोबदल्यासह असणारे हक्कसोडपत्र त्याच एकत्र कुटुंबातील सदस्य किंवा सहहिस्सेदार यांच्या लाभात असल्याने त्यावर मुद्रांक शुल्क आकारले जात नाही तथापि हक्कसोडपत्र नोंदणीकृत असते त्यामुळे ते नोंदणी शुल्कास पात्र असते.
हक्कसोडपत्र नोंदणीकृत असावे
होय, हक्कसोडपत्र हे लेखी आणि नोंदणीकृत असणे अत्यावश्यक आहे अन्यथा त्याची नोंद सरकारी दप्तरात होणार नाही. हक्कसोडपत्र म्हणजे दान/बक्षीस पत्र. हक्कसोडपत्रामुळे हक्काचे हस्तांतरण होते. मालमत्ता हस्तांतरण अधिनियम, १८८२ कलम १२३ अन्वये असे दान/बक्षीस द्वारे झालेले हस्तांतरण नोंदणी झालेल्या लेखाने करणे आवश्यक असते.
नोंदणी अधिनियम १९०८, कलम १७ अन्वये स्थावर मालमत्तेचे दान लेख यांची नोंदणी करणे आवश्यक आहे.
हक्कसोडपत्र कसे करावे
एकत्र कुटुंबातील मिळकतीवरील हक्क सोडणारा आणि तो हक्क ग्रहण करणारा यांना स्वतंत्रपणे अथवा एकत्र कुटुंबातील सर्व सदस्यांना संयुक्तपणे, त्याच एकत्र कुटुंबातील कोणाही एकाच्या किंवा एकापेक्षा जास्त सदस्यांच्या लाभात हक्कसोडपत्राचा दस्त करता येतो.
असा दस्त रक्कम रु. २००/- च्या (अद्ययावत तरतुद पहावी) मुद्रांकपत्रावर (स्टँप पेपरवर) लेखी असावा. याकामी जाणकार विधिज्ञाचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.
हक्कसोडपत्राच्या दस्तात खालील गोष्टी नमूद असाव्यात.
* हक्कसोडपत्राचा दस्त लिहून देणार यांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील.
* हक्कसोडपत्राचा दस्त लिहून घेणार यांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील.
* एकत्र कुटुंबाच्या सर्व शाखांची वंशावळ.
* एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे हिस्सा निहाय विवरण.
* दोन निष्पक्ष आणि लायक साक्षीदारांची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील व स्वाक्षरी.
दस्ताचे निष्पादन व नोंदणी.
हक्कसोडपत्र, स्वत:च्या हिस्स्याच्या सर्व किंवा काही मिळकतींबाबत करता येते. हक्कसोडपत्र स्वत:च्या हिस्स्याच्या कोणकोणत्या मिळकतींबाबत आणि कोणाच्या लाभात करीत आहे आणि स्वत:च्या हिस्स्याच्या कोणत्या मिळकतींबाबत हक्कसोडपत्र केलेले नाही याचा स्पष्ट उल्लेख हक्कसोडपत्रात असावा. यामुळे भविष्यात कायदेशीर अडचण येणार नाही.
हक्कसोडपत्राची मुदत
हक्कसोडपत्र कधीही करता येते, त्यास मुदतीचे बंधन नाही. हक्कसोडपत्रासाठी ७/१२ अथवा मिळकत पत्रीकेवर कुटुंबाच्या सदस्याचे नाव दाखल असण्याची आवश्यकता नसते. फक्त तो एकत्र कुटुंबातील सदस्य असल्याचे सिध्द करण्याइतपत पुरावा असावा.
हक्कसोडपत्राचा दस्त मिळाल्यावर
हक्कसोडपत्राची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी हक्कसोडपत्राचा दस्त हा नोंदणीकृत असल्याची खात्री करावी. अनोंदणीकृत हक्कसोडपत्राची नोंद करु नये. हक्कसोडपत्राची नोंद करतांना संबंधिताने स्वत:च्या हिस्स्याच्या हिस्स्याच्या कोणकोणत्या मिळकतींबाबत आणि कोणाच्या लाभात हक्कसोडपत्र केले आहे आणि स्वत:च्या हिस्स्याच्या कोणत्या मिळकतींबाबत हक्कसोडपत्र केलेले नाही याचा स्पष्ट उल्लेख फेरफार नोंदीत करावा. यामुळे भविष्यात कायदेशीर अडचण येणार नाही. हक्कसोडपत्र नोंदणीकृत असले तरच गाव नमुना ६ मध्ये त्याची नोंद करावी. सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजवावी. अनोंदणीकृत हक्कसोडपत्राची नोंद करणे अवैध आहे.
हक्कसोडपत्र जर एखाद्या महिलेने केले असेल तर
खातेदाराच्या कुटुंबातील महिलेने जर हक्कसोडपत्राचा नोंदणीकृत दस्त करून दिला असेल तर त्या महिलेला प्रश्न विचारुन, तिने हक्कसोडपत्राचा दस्त कोणाच्या दबाबाखाली केला नाही याची खात्री करावी. हक्कसोडपत्रामुळे तिला मालमत्तेत हिस्सा मिळणार नाही याची तिला कल्पना द्यावी. हिंदू वारसा कायदा १९५६ मधील सन २००५ च्या सुधारणेनुसार महिलांनाही मालमत्तेत समान हिस्सा मिळण्याचा हक्क प्राप्त झालेला आहे याचीही तिला कल्पना द्यावी. जरूर तर सदर महिलेचा तसा जबाब घ्यावा.
हक्कसोडपत्रानंतर वारस नोंद
उदाहरण १: मयत शंकररावांच्या नावावर गावात एकच शेतजमीन होती. ते मयत झाल्यानंतर त्यांचे वारस म्हणून त्यांची पत्नी पार्वती, तीन मुले- राजेंद्र, विजय आणि अनिल तसेच दोन मुली- अलका आणि सुलोचना यांची नावे दाखल झाली. काही दिवसानंतर अलका व सुलोचना यांनी भावांच्या हक्कात हक्कसोडपत्र करुन दिले. कालांतराने पार्वती मयत झाली. आता वारस नोंद करतांना पार्वतीचे वारस म्हणून राजेंद्र, विजय आणि अनिल यांची नावे दाखल करावीत आणि अलका आणि सुलोचना या दोन वारसांनी दिनांक ... /.../.... रोजी, राजेंद्र, विजय आणि अनिल या भावांच्या हक्कात हक्कसोडपत्र करुन दिले आहे त्याची नोंद फेरफार क्रमांक ....... अन्वये नोंदविलेली आहे असे नमूद करावे.
उदाहरण २: मयत शंकररावांच्या नावावर गावात तीन शेतजमिनी, एक घर आणि एक फार्महाऊस होते. ते मयत झाल्यानंतर त्यांच्या उपरोक्त पाच मिळकतींना त्यांचे वारस म्हणून त्यांची पत्नी पार्वती, तीन मुले- राजेंद्र, विजय आणि अनिल तसेच दोन मुली- अलका आणि सुलोचना यांची नावे दाखल झाली. काही दिवसानंतर अलका व सुलोचना यांनी भावांच्या हक्कात हक्कसोडपत्र करुन दिले. या हक्कसोड पत्राची नोंद करतांना, अलका व सुलोचना यांनी उपरोक्त कोणकोणत्या मिळकतींवरील हक्क सोडला आहे याची सविस्तर नोंद घ्यावी. जरूर तर ज्या मिळकतींवरील हक्क सोडलेला नाही त्याबाबत स्पष्टपणे नमूद करावे. कालांतराने पार्वती मयत झाली. आता वारस नोंद करतांना पार्वतीचे वारस म्हणून राजेंद्र, विजय आणि अनिल यांची नावे दाखल करावीत आणि अलका आणि सुलोचना या दोन वारसांनी दिनांक ... /.../.... रोजी, राजेंद्र, विजय आणि अनिल या भावांच्या हक्कात ....., ......, या मिळकतींवरील हक्कसोडपत्र करुन दिले आहे, त्याची नोंद फेरफार क्रमांक ......., दिनांक ... /.../.... अन्वये नोंदविलेली आहे. परंतू ....., या मिळकतीबाबत अलका आणि सुलोचना त्यांनी हक्कसोडपत्र करुन दिलेले नाही. त्यामुळे हक्कसोडपत्र करुन न दिलेल्या ......... या मिळकतीवर राजेंद्र, विजय आणि अनिल तसेच अलका आणि सुलोचना यांचे नाव पर्वतीचे वारस म्हणून दाखल केले आहे असे नमूद करावे.

हक्क सोड पत्रास दस्तांची मुद्रांक तथा नोंदणी करणे आवश्यक असते.
हक्कसोड पत्र हे जाणकार वकिलांकडून करून घेणे अभिप्रेत असते.
वकिलांना भेटून रीतसर माहिती मिळवा.

0
Answer link
हक्क सोडपत्र (Release Deed) कसे करावे आणि त्यासाठी कोणाला हजर राहावे लागते, याची माहिती खालीलप्रमाणे आहे:
हक्क सोडपत्र म्हणजे काय?
हक्क सोडपत्र म्हणजे एखाद्या मालमत्तेवरील आपला कायदेशीर हक्क दुसऱ्या व्यक्तीच्या नावे करणे. हे सहसा कुटुंबातील सदस्यांमध्ये केले जाते.
हक्क सोडपत्र करण्याची प्रक्रिया:
-
आवश्यक कागदपत्रे:
- मालमत्तेचे मूळ कागदपत्र.
- तुमचा ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, इ.).
- ज्यांच्या नावे हक्क सोडायचा आहे, त्यांचे ओळखपत्र.
- ७/१२ उतारा आणि मालमत्तेचा दाखला.
-
हक्क सोडपत्राचा मसुदा तयार करणे:
- एक कायदेशीर मसुदा तयार करा ज्यामध्ये मालमत्तेचे संपूर्ण वर्णन, हक्क सोडणाऱ्याचे नाव, ज्याच्या नावे हक्क सोडायचा आहे त्याचे नाव आणि इतर आवश्यक तपशील नमूद केलेले असावेत.
- मसुदा तयार करण्यासाठी तुम्ही वकिलाची मदत घेऊ शकता.
-
नोंदणी:
- हक्क सोडपत्राची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी तुम्हाला दुय्यम निबंधक कार्यालयात (Sub-Registrar Office) जावे लागेल.
- नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्क (Stamp Duty) भरावे लागते. हे शुल्क मालमत्तेच्या किमतीवर अवलंबून असते.
-
witnesses ( साक्षीदार):
- हक्क सोडपत्रावर दोन साक्षीदारांची सही आवश्यक आहे.
७/१२ Varun नाव काढण्यासाठी काय करावे?
- ज्या व्यक्तींना आपले नाव ७/१२ उताऱ्यावरून कमी करायचे आहे, त्या सर्वांना दुय्यम निबंधक कार्यालयात हजर राहणे आवश्यक आहे.
- जर कोणाला हजर राहणे शक्य नसेल, तर ते मुखत्यारपत्र (Power of Attorney) देऊ शकतात. मुखत्यारपत्र धारक त्यांच्या वतीने हजर राहून प्रक्रिया पूर्ण करू शकतो.
महत्वाचे मुद्दे:
- हक्क सोडपत्र नोंदणीकृत असणे आवश्यक आहे, अन्यथा ते कायदेशीर मानले जात नाही.
- हक्क सोडपत्र केवळ कुटुंबातील सदस्यांमध्येच करता येते, जसे की आई, वडील, बहीण, भाऊ, मुलगा किंवा मुलगी.
अधिक माहितीसाठी:
तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात संपर्क साधू शकता किंवा वकिलाचा सल्ला घेऊ शकता.