जात व कुळे
गुरव या समाजाविषयी माहिती हवी आहे?
3 उत्तरे
3
answers
गुरव या समाजाविषयी माहिती हवी आहे?
14
Answer link
गुरव- महाराष्ट्राबाहेर ही जात फारशी आढळत नाही. महाराष्ट्रात ह्मा जातीची संख्या अत्यंत अल्प आहे. मध्यप्रांत वर्हाडांत यांची संख्या १९११ च्या खानेसुमारीप्रमाणें सुमारें १४००० आहे. व मुंबई इलाख्यात ती ६५,५३८ आहे. हैदराबाद संस्थानांत यांची संख्या १७५२२ आहे. आपल्या मूळपुरूषाचें शिवार्चनांत अंतर पडल्याकारणानें महादेवाच्या शापामुळे वैगुण्य प्राप्त होऊन त्यांतच अज्ञान व दारिद्र्याची भर पडल्यामुळें उच्च वर्गापासून आपण च्युत झालों असें सुशिक्षित गुरवांचे म्हणणे आहे. ॠषीपासून गुरवांची उत्पत्ति असल्याचें शिवपुराणावरून दिसून येतें. वेतन घेऊन पूजा करणारे ब्राह्मण हव्यकव्य व श्राध्दकर्मी निषध्द आहेत असें स्मृतिकार व धर्मशास्त्रकार यांनी ठरविल्यामुळें स्मृतिकालापासून गुरवांच्या अवनतावस्थेस आरंभ होऊन शिवपुराणकाली गुरव ही निराळी जात बनली असावी. गर्भाधान, उपनयनादि सर्व संस्कार, गायत्र्याधिकार वगैरे बाबतीत व सामान्य: आचारविचारांत श्रेष्ठ प्रतीच्या गरवांत व इतर ब्राह्मणांत सकृदर्शनी कांही एक भेद दिसून येत नाही. श्रीशिवगंगापीठाच्या श्रीमच्छंकराचार्यांची स्वारी १९१२ साली वैदर्भ प्रांती संचारार्थ गेली असता त्यांनी गुरव हे ब्राह्मण असल्याबद्दल आपला अभिप्राय दिल्याचें सांगतात. गुरवांत सांप्रत बालविवाह व पुनर्विवाह रूढ झालेला आहे. परुंतु त्याला वरिष्ठ गुरवसमाजाकडून गौणस्थान देण्यांत येतें. गुरवांत उपनयन, गर्भाधान, विवाहादि सर्वच संस्कार यथासांग आहेत. त्यांना फक्त इतर श्रेष्ठ ब्राह्मणांच्या हाताचें अन्नोदक चालतें. मुंबई इलाख्याकडे गुरव जातीचे स्वतंत्र उपाध्याय कित्येक ठिकाणी उपलब्ध नसल्यास ब्राह्मण भटजीची योजना होते. वर्हाडात असले शैव भटजी पूर्वी असत, पण आज नाहीसे झाले आहेत. मध्यप्रांतात शैव भटजी केव्हाच अस्तित्वांत नसून ब्राह्मणच सर्व कर्मे करतात.
1
Answer link
गुरव समाज हा समाज शैव समाज असून तत्कालीन कर्मठ शैव व वैष्णव ब्राह्मणांनी ह्या गोष्टीचा तीव्र विरोध केला. आजही गावागावात फक्त गुरव समाज मंदिरामध्ये पूजा अर्चना करताना दिसतात. कारण त्यांच्याकडेच हे काम पारंपरिक रित्या चालत आलेले आहे. संत काशीबा गुरव हे गुरव समाजातील थोर संत होऊन गेले.
गुरव हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. मुलाण्याप्रमाणेच हाही तिसऱ्या क्रमांकाचा बलुतेदार. गुरवाने देवळात देवाची पूजा करायची, आणि घरोघरी बेल, पत्री वगैरे पोचवायच्या. अजूनही अनेक गावांतील देवळांत ब्राह्मण पुजाऱ्याऐवजी गुरव असतो.
इतिहासाप्रमाणे स्मार्त आणि वैष्णव ब्राह्मण ह्या दोन ब्राह्मण जाती अस्तित्वात होत्या . गुरव समाज हा समाज शैव समाज असून तत्कालीन कर्मठ शैव व वैष्णव ब्राह्मणांनी ह्या गोष्टीचा तीव्र विरोध केला. आजही गावागावात फक्त गुरव समाज मंदिरामध्ये पूजा अर्चना करताना दिसतात. कारण त्यांच्याकडेच हे काम पारंपरिक रित्या चालत आलेले आहे. संत काशीबा गुरव हे गुरव समाजातील थोर संत होऊन गेले. संत सावता माळी यांचे ते समकालीन होते. त्यांनी लिहिलेले ग्रंथ आजही आहेत. भगवान शंकरांच्या पूजेचा मान फक्त शैव लोकाना असायचा तेच आजचे गुरव. आणि काळानुरूपे ते गुरव च राहीले .मंदिरातील पूजा अर्चना गुरव समाज करत असल्याने गावातून त्यांना धान्य किंवा काही वार्षिक मानधन अस दिल जात. आणि गुरवांचा उल्लेख हा 12 बलुतेदार मध्ये आता येतो. गुरवांचा इतिहास तसा खूप पुरातन काळापासून आहे फक्त त्यावर साहित्य निर्माण झालं नाही .
गुरव/जाती/उपजाति/शाखा/भेद (62पजाती) गुरव:- शैव पुजारी(प्रचलित नाम), शैव गुरव,पुजारी, गुरव पुजारी, लिंगायत गुरव, जैन गुरव, हिन्दू गुरव, हिन्दू शैव गुरव, मराठा गुरव,देवलक , गुरव,भाटिया , शिवपूजक गुरव, शैव पुजारी,नगरे (नगरचे नागरी/जुन्नरे (जुन्नरचे जुनरी)निलकंठ गुरव, स्वयंभू गुरव,कडू गुरव,कोटसने गुरव किंवा गसरात(घासरट) गुरव, हुगार गुरव, जीर किंवा मलगार गुरव, कोकणी गुरव, भाविक गुरव,अहिरे
गुरव व गुरवकी ही व्यवसाय वरून पड़लेली संबधित जात आहे.तामिळनाडूत गुरुवन, कर्नाटकात जिर, गुजरात मधे शिवालयाशी संबंधित तपोधन ,राजस्थानात दधिच दायमा, मधप्रदेशात शिवद्विज, शिवपूजक गुरव,कोकणपट्टी भागात गुरव समाजाला कुणबी किंवा कुरवाडी गुरव, मध्यप्रदेश व् उत्तर प्रदेशातील शिवालयाशी संबंधित शर्मा असे संबोधले जाते. तामील भाषेत शिवभक्ताना नायनार म्हणतात. कर्नाटकात बलुतेदाराना आयगार म्हटलेले आहे.पाटिलकी,कुलकर्णी, देशमुखी तशीच गुरवकी/गावकी असते.
गुरव जातीत अनेक पोटजाति आहेत.गट आहेत.
0
Answer link
गुरव समाज: माहिती
उत्पत्ती आणि इतिहास:
- गुरव समाज हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात आढळणारा एक समुदाय आहे.
- ते मूळतः मंदिरांचे पुजारी म्हणून काम करतात.
- या समाजाचा इतिहास खूप जुना आहे आणि ते शैव परंपरेतील मानले जातात.
व्यवसाय:
- गुरव समाजाचा मुख्य व्यवसाय पूजा करणे, मंदिरांची देखभाल करणे आणि धार्मिक विधी करणे हा आहे.
- काही गुरव शेती आणि इतर पारंपरिक व्यवसाय देखील करतात.
संस्कृती आणि परंपरा:
- गुरव समाजामध्ये अनेक पारंपरिक चालीरिती आणि सण साजरे केले जातात.
- ते विविध देवी-देवतांची पूजा करतात, ज्यात महादेव आणि पार्वती प्रमुख आहेत.
- या समाजात लग्न आणि इतर सामाजिक कार्यक्रमांमध्ये विशिष्ट परंपरांचे पालन केले जाते.
सामाजिक स्थिती:
- गुरव समाज हा शिक्षण आणि सामाजिक सुधारणांच्या बाबतीत प्रगती करत आहे.
- अनेक गुरव आता शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांमध्ये काम करत आहेत.
अधिक माहितीसाठी:
- तुम्ही गुगलवर 'गुरव समाज' असे सर्च करून अधिक माहिती मिळवू शकता.
टीप: मी दिलेली माहिती ही सर्वसाधारण आहे. अधिक विशिष्ट माहितीसाठी, तुम्ही विश्वसनीय स्रोत आणि तज्ञांचा सल्ला घ्यावा.