दागिणे

शुद्ध सोनं कसे ओळखाल?

3 उत्तरे
3 answers

शुद्ध सोनं कसे ओळखाल?

8
*💍👑असं ओळखा २४ कॅरेट, २२ कॅरेट, १८ कॅरेट सोनं?*
--------------------------------------
सोन्याने अनेकांना भूरळ घातलीय, आणि सोनूवर भरोसा ठेवायचा असेल तर त्याची शुद्धता कॅरेटवरून ठरते. तुम्ही आतापर्यंत २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोनं ऐकलं असेल. २४ कॅरेट सोनं हे सर्वात शुद्ध सोनं असतं, असं म्हटलं जातं. पण २४ कॅरेट सोनं आणि २२ कॅरेट सोनं यात फरक काय, हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

एवढंच नाही, तर २४ कॅरेट सोनं जरी सर्वात शुद्ध समजलं जातं, तरी २२ किंवा १८ कॅरेट सोन्याचेच जास्त दागिने का बनवले जातात, याचं देखील उत्तर तुम्हाला थोडक्यात खाली मिळणार आहे.

लग्नसराईत सोनं खरेदी करण्याआधी लोक विचारता मेकिंग, बनवण्याचा किंवा घडाईचा, म्हणजेच सोन्याचा दागिना घडवण्याचा दर किती? पण त्या शिवाय हे सोनं किती कॅरेटचं आहे हे देखील जाणून घेतलं पाहिजे.

*२४ कॅरेट सोनं म्हणजे काय?*
२४ कॅरेट सोन्याबद्दल आपण बोलत आहोत, म्हणजे याचाच अर्थ आपण शुद्ध सोन्याबद्दल बोलत आहोत. २४ कॅरेट सोन्यात सोन्याची शुद्ध मात्रा ९९.९ टक्के असते. शुद्ध सोन्याचं प्रमाण २४ कॅरेट सोनंच मानलं जातं, कारण यात ९९.९ टक्के शुद्ध सोनं असतं.

२४ कॅरेट सोनं अतिशय लवचिक असतं हीच त्याची ओळख आहे. सोनं असा एक धातू आहे, त्याला कागदापेक्षाही पातळ बनवता येतं. २४ कॅरेटचं सोनं अधिक लवचिक असल्याने त्याचे दागिने बनवणे देखील अवघड काम आहे.

*शुद्ध सोनं कसं ओळखता येतं?*
शुद्ध सोनं अधिक लवचिक असतं, ज्यामुळे वाकवून त्याचे दागिने बनवता येतात. अधिक शुद्ध, म्हणजे २४ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा आकार लवकर खराब होतो, त्यामुळे नंतर हे सोनं नीट दिसत नाही.

भारतात जास्तच जास्त महिला, दागिन्यांमध्ये इयर रिंग, अंगठी, गळ्यातील सोन्याची साखळी वापरतात.

असं सोनं लोक नेहमीच घालून ठेवतात, आणि यामुळे असं सोनं २४ कॅरेट सोन्याने बनवलं तर ते लवकरच वाकतील आणि बेढब होतील.

*२२ कॅरेट सोनं?*
22 कॅरेट सोन्याच्या दागिने जास्त वापरले जातात. २२ कॅरेट सोनं, २४ कॅरेट सोन्याच्या मानाने कमी शुद्ध असतं, २४ कॅरेट सोन्यात ९९.९ टक्के सोनं असतं.

तर २२ कॅरेट सोन्यात ९१.६ टक्के सोनं असतं. तांबे आणि झिंक सारखे धातू यात मिसळे जातात, त्याचं प्रमाण अत्यल्प असतं.

*१८ कॅरेट सोनं?*
१८ कॅरेट सोनं म्हणजे सर्वात आधी सोनं खरेदी करण्याची वेळ येते, तेव्हा सोन्याचे भाव विचारले जातात.

१८ कॅरेट सोन्यात ७५ टक्के सोनं असतं. २५ टक्के सिल्ह्वर, तांबं, निकेल, झिंकचाही यात समावेश असतो.

ज्या सोन्यात हिरे मोती जडलेले असतात, असे दागिन्यात ७५ टक्के सोनं असतं, असं सोनं १८ कॅरेटचं असतं.

२४ कॅरेट आणि २२ कॅरेटपेक्षा १८ कॅरेट सोनं मजबूत असतं. सोन्याचं प्रमाण कमी होताना, इतर धातू मिसळण्याचं प्रमाण वाढल्याने सोनं मजबूत होतं.
उत्तर लिहिले · 3/10/2018
कर्म · 569225
1
कसल लावून किंवा तुम्ही जर मोठ्या सिटीत राहत असाल तर सराफा मार्केट मध्ये जाऊन तिथे गोल्ड टेस्टिंग मशीनवर ५० रुपये (हा दर कमी जास्त असू शकतो) तुम्हाला सोन्याची शुद्धता सर्टिफिकेट सह कळेल.
उत्तर लिहिले · 14/2/2018
कर्म · 25
0

शुद्ध सोनं ओळखण्यासाठी काही सोप्या पद्धती:

  • व्हिज्युअल टेस्ट (Visual Test): शुद्ध सोनं चमकदार आणि एकसारखे पिवळे असते. जर तुम्हाला रंगात फरक दिसत असेल, तर ते शुद्ध नसेल.
  • मार्किंग टेस्ट (Marking Test): सोनं ceramic प्लेटवर घासा. जर काळा रंग आला, तर ते सोनं नाही. शुद्ध सोनं पिवळा रंग देईल.
  • ॲसिड टेस्ट (Acid Test): स्टेनलेस स्टीलवर थोडं सोनं घासा आणि त्यावर नायट्रिक ॲसिड (nitric acid) टाका. जर ते हिरवे झाले, तर ते सोनं नाही.
  • वॉटर टेस्ट (Water Test): एक ग्लास पाण्यात सोनं टाका. जर ते बुडाले, तर ते शुद्ध असण्याची शक्यता आहे, कारण सोन्याची घनता जास्त असते. पण जर ते तरंगले, तर ते शुद्ध नाही.
  • मॅग्नेट टेस्ट (Magnet Test): सोनं चुंबकाला आकर्षित करत नाही. जर सोनं चुंबकाला आकर्षित झाले, तर ते भेसळयुक्त आहे.
  • एक्स-रे फ्लोरोसन्स (X-ray fluorescence): हे एक वैज्ञानिक उपकरण आहे, ज्यामुळे सोन्यातील घटकांची अचूक माहिती मिळते.

टीप: ह्या चाचण्या केवळ प्राथमिक अंदाज देण्यासाठी आहेत. अचूकतेसाठी प्रमाणित प्रयोगशाळेत तपासणी करणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 760

Related Questions

पर्यावरणस्नेही गणेशोत्सव: कागदाचा लगदा, मखर, आकर्षक मनोहरी दागिने, घरपोच सेवा, आकर्षक जाहिरात?