नोकरी
बेकारी म्हणजे काय?
3 उत्तरे
3
answers
बेकारी म्हणजे काय?
0
Answer link
बेकारी म्हणजे अशी स्थिती होय, की जेथे व्यक्ती प्रचलित मजुरीच्या दरावर काम करायला तयार असतो परंतु त्याला काम मिळत नसते. बेरोजगारीमुळे देशातील मानव साधनसंपत्तीचा अपव्यय होतो. बेरोजगारोमुळे देशासमोरील अनेक समस्यांमध्ये वाढ होते. बेकारीमुळे देशातील सकल राष्ट्रीय उत्पन्न कमी राहते आणि समाज हा गरीब व मागासलेला राहतो. बेकारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो. भारतात १९८० ते १९९५ या काळात मोठ्या प्रमाणात बेकारी होती. परंतु मुक्त अर्थव्यवस्थेमुळे देशातला रोजगार निर्मितीचा प्रश्न बर्याच अंशी कमी झाला आहे. तरीही बेकारीची समस्या वाढते आहे.
0
Answer link
बेकारी म्हणजे अशी स्थिती ज्यात व्यक्ती काम करायला तयार असूनही त्याला काम मिळत नाही.
थोडक्यात, बेकारी म्हणजे रोजगाराची उपलब्धता नसणे.
बेकारीचे अनेक कारणे असू शकतात, जसे:
- शिक्षण आणि कौशल्यांचा अभाव
- लोकसंख्या वाढ
- आर्थिक मंदी
- तंत्रज्ञानाचा विकास (ज्यामुळे काही कामे कमी झाली आहेत)
बेकारी एक गंभीर समस्या आहे, ज्यामुळे व्यक्ती आणि समाजावर नकारात्मक परिणाम होतो.