कागदपत्रे जात व कुळे प्रक्रिया

कुणबी(OBC) ची Cast Certificate कशी काढावी ? मी जालना डिस्ट्रिक्ट मध्ये राहतो ?

2 उत्तरे
2 answers

कुणबी(OBC) ची Cast Certificate कशी काढावी ? मी जालना डिस्ट्रिक्ट मध्ये राहतो ?

4
जात प्रमाणपत्र / जातीचा दाखला

आपण ज्या जातीचे आहोत ती प्रमाणित करणारा सरकारी दस्त ऐवज म्हणजे जातीचा दाखला.

जेव्हा नागरिक विशीष्ट प्रवर्गातील असेल तेव्हा जातीचे प्रमाणपत्र महत्व्याचे ठरते.महाराष्ट्र मध्ये एस.टी./एस.सी./एन.टी./एस.बी.सी./ओ.बी.सी.या प्रवर्गातील जाती प्रमाणपत्र दिले जाते.परंतु केंद्रात एस.टी./एस.सी./ ओ.बी.सी.याच प्रवर्गासाठी जाती प्रमाणपत्र दिले जाते.केंद्रात एन.टी./एस.बी.सी./ओ.बी.सी.यासाठी सेन्ट्रल ओ.बी.सी प्रमाणपत्र दिले जाते. ज्या अंतर्गत विशिष्ट जाती समूहाला विविध सेवा सवलतीचा लाभ घेता येणे शक्य होते.त्यात प्रामुख्याने —

१.सरकारी नोकरीत आरक्षण २.शाळा महाविद्यालयात प्रवेश शुल्कामध्ये पूर्ण किंवा ठराविक सूट

३.शैषणिक संस्थेत प्रवेश कोटा. ४.काही सरकारी नोकरीत वयोमर्यादेत अतिरिक्त वयाची सूट ५. शैषणिक शिष्यवृत्ती इ.आशा विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला सोबतच जात पडताळणी प्रमाणपत्र असणे हि आवश्यक असते.जर विद्यार्थी किंवा नागरिक एस.टी.व एस.सी प्रवर्गातील असेल तर असे जर पडताळणी प्रमाणपत्र असणे बंधनकारक असते.

जातीचे प्रमाणपत्र प्राप्त करण्याची पद्धत

जातीचा दाखला प्राप्त करण्यासाठी आता गावो गावी सेतू कार्यालयांची स्थापना झालेली आहे.सर्व सेतू कार्यालय हे मा.तहसिलदार यांच्या आखत्यारीत येतात.त्याच प्रमाणे तहसीलदार कार्यालयात देखील आपण जातीचा दाखला प्राप्त करण्यासाठी प्रस्ताव सादर शकतात. जर आपल्या कुटुंबातील जातीचा दाखला प्राप्त करण्यासाठी प्रथमच प्रस्ताव असल्यास स्थानिक चौकशी, राज्य निवासी प्रमाणपत्र, स्टँप पेपरवर जातीचा उल्लेखासह प्रतिज्ञा पत्र आदी.कागदपत्रांची आवश्यकता असते.

एस.टी.(ST) एस.सी (SC) करिता आवश्यक कागदपत्रे

* विहित नमुन्यातील अर्ज कोर्ट फी स्टँप सह.प्रतिज्ञा पत्र व नातेवाईकाचे प्रतिज्ञापत्र

* शालासोडल्याचा दाखला जर अर्जदार अशिक्षित असेल तर मुलाचे मुलीचे शाळेचा दाखला.प्राथमिक शाळेचा प्रवेश निर्गम उतारा.

*शासकीय संस्थेत असल्यास सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाचा प्रमाणित उतारा.

*आजोबा,वडील,सख्या भाऊ-बहिण यांची जात नमूद असलेला दाखला म्हणजेच त्यांचा शालेय पुरावा.

*अर्जदार परराज्यातील स्थलांतरीत असल्यास तेथील जातीचे दाखल्याची प्रत.

*मंडळ अधिकारी यांचा गृह चौकशी अहवाल.

*लाईटबिल,घर कर पावती,भाडेपत्र,शिधापत्रिका उतारा.

…………………………………………………………………………………………………………………………………

OBC ओ.बी.सी.प्रवर्गाकरिता

वरील प्रमाणे कागदपत्रे व मागील ०३ वर्षाचा उत्पन्नाचा दाखला.

…………………………………………………………………………………………………………………………………

SBC एस.बी.सी.प्रवर्गाकरिता

वरील प्रमाणे कागदपत्रे व मागील ०३ वर्षाचा उत्पन्नाचा दाखला.

V J/NT व्ही.जे.एन.टी.प्रवर्गाकरिता

वरील प्रमाणे कागदपत्रे व रक्ताचे नातेवाईकाचे वैध प्रमाणपत्र व अर्जदार यांचा नातलग असल्याचे प्रमाणपत्र , ज्या सक्षम प्राधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातून जात प्रमाणपत्र मागणी करिता आहे.त्या क्षेत्रात मागील १५ वर्षांपासून राहत असल्याचा पुरावा.

…………………………………………………………………………………………………………………………………

कुणबी ओ.बी.सी.जातीचे प्रमाणपत्र प्राप्तीसाठी

वरील प्रमाणे कागदपत्रे पुरावे नसतील तर सम्बन्धित व्यक्तीला खालील प्रमाणे कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक राहील.

*खापर पंजोबा आणि पंजोबा यांचे जुने कुणबी उल्लेख असलेले पुरावे.उदा.रेकॉर्डरूम तहसील कार्यालय येथे गाव नं.१४ चा उतारा ज्यात नाव व कुणबी उल्लेख आढळतो.साधारणता ते सन १९६१ पूर्वीचे असावेत.

*जुने खरेदीखत त्याच बरोबर वंशावळ व प्रतिज्ञापत्र

*अर्जदाराने सादर केलेले दस्तऐवज मोडी लिपीतील असतील तर मोडींमधील दस्तऐवजांचे शासनमान्यता प्राप्त मोडी वाचकाकडून मराठीत रुपांतर करून तसे प्रतिज्ञापत्र स्टम्प पेपरवर करावे.व मूळप्रत जोडावी.

जातीचा दाखला प्राप्त करण्यासाठी वयाची अट नसते.जातीचा दाखल्याच्या वेळी जे प्रतिज्ञा द्यावे लागते.ते अर्जदार वय १८ पूर्ण नसल्यास त्याचे पालक सादर करून जातीचा दाखला प्राप्त करू शकतात.

—————————————————————————————————————————                                     जात पडताळणी

उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप,आरक्षणासाठी पात्र दर्शवण्यासाठी,निवडणुकीतील आरक्षण,नोकरीसाठी इ.

आवश्यक असते.१२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी,निवडणुकीतील उमेदवार व नोकरवर्ग व्यक्ती यांचे जातपडताळणी प्रस्ताव सम्बन्धित कार्यालयातून पाठविले जातात.

विहित नमुन्यातील अर्ज जो काटेकोरपणे उमेदवाराचा मोबाईल नंबर,वडिलांचा मोबाईल नंबर सह भरणे आवश्यक आहे.उमेदवाराचा प्राथमिक शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला.उमेदवाराचा जातीचा ओरिजनल दाखल.वडिलांचा प्राथमिक शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला.वडिलांचा जातीचा दाखला उपलब्ध असल्यास.आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला नसल्यास गाव नमुना क्र.१४ उतारा जन्म मृत्यू नोंदीचा दाखला.अर्जदाराच्या कुटुंबातील वडील,मुलगा,मुलगी,भाऊ,बहिण,यांची जात प्रमाणपत्र पडताळणी झाली असल्यास त्या प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत.जर वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखलयात किंवा जन्म मृत्यू दाखल्यात जातीचा उल्लेख नसेल तर अर्जदाराचे काका,आजोबा,आत्या,पंजोबा,खापर पंजोबा,यांचे जातीचे स्पष्ट नोंद आहे अस प्राथमिक शाळा सोडल्याचे किंवा जन्म मृत्यूचे दाखले.नाते संबंध सिद्धतेसाठीमहसुली पुरावे ज्यात ७/१२ उतारा,वारसनोंद,वाटणीनोंद,हक्काचे पत्रक,फेरफार नोंद,कडईपत्रक.१०० रुपयाच्या स्टँपवरील वंशावळ मुळप्रत जोडावी.व१०० रुपयाच्या स्टँपवरील अर्जदाराचे वैयक्तिक प्रतिज्ञापत्र मूळप्रत जोडावे.नाव आडनाव यात बदल असल्यास राजपत्र अथवा प्रतिज्ञापत्र जोडावे.अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे हि सम्बन्धित अधिकाऱ्यांनीच दिलेली आहे असे प्रतिज्ञापत्र सोबत जोडावे.अर्जदाराने सादर केलेले दस्तऐवज मोडी लिपीतील असतील तर मोडीमधील दस्तऐवजाचे शासनमान्यता प्राप्त मोडी वाचकाकडून मराठीत रुपांतर करून तसे प्रतिज्ञापत्र स्टँप पेपरवर करावे. व मूळप्रत जोडावी.
उत्तर लिहिले · 19/10/2017
कर्म · 4640
2
खालील उत्तरात Caste Certificate कसे काढावे याची माहिती दिली आहे.

उत्तर लिहिले · 27/5/2017
कर्म · 282915

Related Questions

) स्वतःच्या कार्याचे नियोजन आणि नियमन करण्याची प्रक्रिया म्हणजे होय. (अ) निर्णय प्रक्रिया (क) अभिप्रेरणा ) (ब) स्वयंव्यवस्थापन (ड) कौशल्य?
सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी स्वतः राजीनामा द्यावयाचे ठरवले तर ते कोणाकडे दे़णार व त्याची प्रक्रिया काय आहे?
संशोधन प्रक्रिया संशोधनाचे स्वरूप संकल्पना व माहिती याविषयीची माहिती द्यावी?
प्रणाली उपागामात आदान, प्रक्रिया -ही तीन घटक समाविष्ट आहेत.?
ज्ञानरचनावादी पद्धतीमधील अध्ययन ही प्रक्रिया आहे?
निवडणूक प्रक्रिया म्हणजे काय?
मुलं शिकण्याची प्रक्रिया?