Topic icon

प्रशिक्षण

4
 दिव्यांगांचे 21 वेगवेगळे प्रकार 

1.पूर्णत:अंध 
🔰पूर्णत:अंधत्वाची व्याख्या :-

 "दृष्टीचा पुर्णपणे अभाव असणारे किंवा चांगल्या डोळ्याची दृष्टितीक्ष्णता 10/200 किंवा 3 ते 60 स्नेलन पेक्षा कमी आहे. तसेच दृष्टिक्षेत्र मर्यादा 10 डिग्री अंश पेक्षा कमी दृष्टीकोनाचे क्षेत्र असणे म्हणजे पूर्णत : अंध होय."
2.अंशत:अंध 
व्याख्या :- “एक डोळा निकामी असणे किंवा दोन्ही डोळ्यांची दृष्टि कमी असणे तसेच जवळचे आणि लांबचे न दिसणे या प्रकारातील दृष्टीदोष म्हणजे अंशत:अंध  होय.”
🔰वैद्यकीय दृष्टिकोनातून केल्या गेलेल्या अंधात्वाच्या व्याख्या
“चांगल्या डोळ्याची दृषसहा ऑब्लीक 18 किंवा वीस ऑब्लिक 60 अपेक्षा कमी आणि 3 ऑब्लिक आठ किंवा दहा पब्लिक 220 नेलं यापेक्षा कमी दृष्टी ती क्षमता असणे तसेच दृष्टी क्षेत्र मर्यादा 10 ते 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत दृष्टिकोनाचे क्षेत्र असणे."

"ज्या व्यक्तींना ऐकायला येत नाही किंवा ज्या व्यक्तींची ऐकण्याची क्षमता खूप कमी असते अशा व्यक्तींना कर्णबधिर असे संबोधले जाते. ऐकायला येत नसल्या कारणाने त्यांचा भाषा व वाचा विकास होत नाही. म्हणजेच त्यांना बोलता येत नाही.हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे."
3.कर्णबधिर ची व्याख्या :-
"ज्या व्यक्तींच्या चांगल्या कानाचा श्रवणऱ्हास हा 60 DB किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशा व्यक्तींना कर्णबधिर व्यक्ती असे म्हणतात." किंवा "ज्या व्यक्तींचा दोन्ही ही कानाचा श्रवणऱ्हास 70DB किंवा त्यापेक्षाही जास्त असतो त्यांना कर्णबधिर म्हणून ओळखले जाते."
4.वाचादोष 
व्याख्या :- "वाचादोष म्हणजे अडखळत बोलणे,अस्पष्ट बोलणे, शब्दाची तोडफोड करणे किंवा बोलताना शब्द मागेपुढे करणे,तसेच बोलण्यामध्ये तारतम्य नसणे."

  टाळूला होल असणे, जीभ जाड असणे, जिभेचा शेंडा नसणे, तोतरे बोलणे, क्लेप्ट पॅलेट , बोलण्यात अडखळणे इत्यादी लक्षणे वाचादोष मध्ये असू शकतात.
5.अस्थिव्यंग
व्याख्या :-"अस्थिव्यंग म्हणजे चलन वलन विषयक विकलांगत्व होय."

  ज्यांचे हाडे,स्नायू,हे योग्य प्रकारे काम करत नाहीत.अशा व्यक्तींना अस्थिव्यंग असे म्हणतात.प्रामुख्याने यात मैदानी खेळ हस्तकौशल्य याकडे विशेष लक्ष पुरवावे लागते या मुलांची हालचाल मर्यादित असते किंवा हालचाल करताना सर्वसामान्य मुलांप्रमाणे नसते हे सहज दिसून येणारे अपंगत्व आहे विशिष्ट संचलन क्रिया करण्यास अक्षम असतात.
6.मानसिक आजार
व्याख्या:-"असामान्य किंवा अस्वाभाविक वर्तन तसेच मेंदूमध्ये मतिमंदत्वखेरीज अन्य आजार व त्यामुळे सकारात्मक किंवा नकारात्मक मानसिक आजारी असणारी व्यक्ती होय." नेहमी कसलीही मनात भीती वाटणे,नेहमी गुमसुम राहणे इत्यादी.
7.अध्ययन अक्षम 
🔰कास आणि मायकेल यांची व्याख्या 

व्याख्या:-"ज्या मुलांमध्ये शैक्षणिक क्षमता असते अशा मुलांमध्ये बहुतेक वेळा त्यांनी दिलेल्या प्रसंगी काय केले आणि त्यांच्याकडून काय त्या प्रसंगी अपेक्षित होते किंवा आहे यामध्ये तफावत आढळून येते ही तफावत एक किंवा अनेक बाबतीत आढळून येत असते."

🔰अध्ययन अक्षम असणाऱ्यांना मुलांमधील दोष 
◼ अभ्यासात मागे राहणे,एखादी गोष्ट समजण्यास अडचणी येणे.

◼ आकलन करण्यास मागे येणे.

◼ विशिष्ट अध्ययातील अडचणी.

◼ विशेषत: वाचन,लेखन आणि गणितात अडचणी येतात.

◼ आरशात प्रतीमासारखे उलट सुलट लेखन करणे.

◼ अंक ओळखन्यात आडचन येणे,शब्द ओगळणे किंवा जास्त शब्द जोडणे.

हातापायाची आकड असणे,मेंदूचा शरीरावर ताबा नसणे, हलन चलन क्षमता कमी असते.
8.मेंदूचा पक्षाघात
"मेंदू वर झालेला आघात व अपघात यामुळे मेंदूचा विकास प्रक्रियेवर परिणाम होऊन शरीराच्या एका किंवा अनेक भागाचे नियंत्रण कमी झाल्याने बहुविध प्रकारची विविधांगी विकलांगता असलेली व्यक्ती म्हणजेच मेंदूचा पक्षघात असलेली व्यक्ती असे आपण म्हणू शकतो.
 9.स्वमग्नता 
"स्वतःच्याच भावविश्वात रमून गेलेले, तसेच समाजात कमी प्रमाणात मिसळणारे,आत्मकेंद्री,भाषिक कौशल्य यांचा विकास होत नसणारे, सभोवतालची परिस्थिती काय आहे आणि आपण काय करत आहोत या गोष्टीचे भान नसणारे व्यक्ती म्हणजेच स्वमग्नता होय."

10.बहुविकलांग 
"सेरेब्रल पाल्सी,मतिमंदत्व,अंधत्व इत्यादी एकापेक्षा जास्त अपंगत्व एकाच व्यक्तीत असेल तर त्याला बहुविकालांग व्यक्ती म्हटले जाते."

11.कुष्ठरोग 
"कुष्ठरोगाच्या आघातामुळे हातापायाला विकृती दिसते.त्वचेवर चट्टे,खवले,डाग असतात.हात पाय,बोटे सुन्न असतात."
12.बुटकेपणा
"शारीरिक उंची कमी असणाऱ्या प्रौढ व्यक्तींची उंची 4 फूट 10 इंच किंवा 147 से. मी. पेक्षा कमी असते.शारीरिक गुणसूत्रांमुळे शरीराची वाढ व विकास इतर मुलांपेक्षा कमी प्रमाणात होतो. "
13.बौद्धिक अक्षमता 

 
"या व्यक्तीच्या बुध्दीच्या विकास कमी झाल्याने किंवा खुंटल्याने शिकण्यात समस्या येतात ,कठीण जातात दैनंदिन कामे, सामाजिक कार्य, दैनंदिन व्यवहार करण्यास अवघड जाते.अध्ययनामध्ये विविध समस्या येतात,तसेच वर्तन समस्या काही प्रमाणात दिसून येतात. "
14.अविकसित मांसपेशी 
"या आजारांमध्ये स्नायू व विकसित झालेली असतात. दैनंदिन काम करण्यामध्ये या सामर्थ्याचा आठवण येते. शरीराची हालचाल करण्यास समस्या येतात. या आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींच्या शरिरातील ठराविक भागांमध्ये अवयवातील सहावीतील तंतू कमजोर होऊन किंवा नष्ट होऊ लागतात .यालाच मस्कुलर डिस्ट्रॉफी असे म्हणतात. हा हजार सणाविषयी संबंधित आहे."

15.मज्जासंस्थेचे तीव्र आजार 
तीव्र डोकेदुखी, ब्रेन ट्यूमर,मेंदूज्वर, तीव्र स्वरूपामध्ये ताप येणे,चेतासंस्थेमध्ये क्षती निर्माण होणे ,हायड्रोसिफलिक, संतुलन बिघडणे ही लक्षणे यामध्ये आढळून येतात.
16.मल्टिपल स्कलेरोसिस
◼ हातापायातील स्नायूंमधील ताठरता किंवा कमजोरी संवेदना मध्ये परिवर्तन होणे.

◼ संवेदना कमी होण्याचे प्रमाण पायाकडून वरील दिशेने बदल करत चालते. 

 

◼ स्नायूमधील शिथिलताही येते व स्नायू काम करणे थांबवतात.

 

◼ मलद्वार व मूत्राशयाचा वरील नियंत्रण कमी होते व त्यांचे कार्य कमी होते .

◼ नेत्र कंप , डोळ्याभोवतालची या स्नायूच्या कार्यातील बदल आणि नेत्र कंपास सुरू होतो .

हा विकार मेंदूतील चेता संस्थेतील संदेश वाहक चेतातंतू वरील संरक्षक आवरण मायलिन ला धक्का पोहोचतो आणि मायला धक्का पोहोचण्याचा परिणाम मेंदूकडून शरीराच्या अन्य अवयवांकडे पोहोचवणाऱ्या संदेशावर होतो याचा परिणाम म्हणून वरील लक्षणे तयार होतात. 
17.हिमोफिलिया (Hemophilia)।
या आजरा मधील व्यक्तींचा रक्तस्राव कधीकधी थांबत नाही. रक्तवाहिन्यांतील बिघाडामुळे हा रोग होतो. यामध्ये रक्तस्राव होणे चे प्रमाण अधिक असते. रक्तस्राव बंद झाल्याने शरीराचा भाग फोडला जातो. हा अनुवंशिक रक्तविकार आहे.

18.थॅलेसेमिया
◼ वारंवार आजारी पडणे. 

◼ श्वास घेण्यास त्रास होणे. 

◼ बालकांची वाढ खुंटणे. 

◼ चेहरा सुखावलेला सजवलेला दिसणे. 

◼ वजन वाढत नाही. 

◼ श्वास घेण्यास त्रास होतो. 

◼ वारंवार रक्त पुरावे लागते. 

◼ रक्तची हिमोग्लोबिन मध्ये कमतरता असते.
19.सिकल सेल डिसीज
◼ रक्ताचे शरीरामधील प्रमाण कमी असणे. 

◼ रक्ताच्या कमतरतेमुळे शरीराचे अवयव अंग खराब होणे. 

◼ शरीरातील पेशींचा आकार C सारखा बदलतो . 

◼ हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होऊन थकवा जाणवतो.

  शरीराच्या ज्या भागावर ऍसिड हल्ला झाला असेल ती जागा भाजल्यासारखे विद्रूप दिसते चेहरा हात पाय डोळे यावर काळे रंगाची त्वचा आढळते.

21.कंपवात रोग 
कंपवात म्हणजेच पार्किन्सन्स डिसीज हा मेंदूतील सबस्टांशिया नावाच्या भागातील पेशींची संख्या आणि कार्य कमी झाल्याने होणारा आजार आहे. 

◼ माणसाच्या हालचालीतील सुबकता ,डौल या रेणूमुळे प्राप्त होते .

 

◼ या रेणूच्या अभावामुळे रोग्याच्या शरीराला कंप सुटतो हालचाली संथावतात . 

◼ स्नायू ताठर होतात.  

◼ कंपवात होतो त्यामुळे वजन कमी होते . 

◼ तांत्रिकीय तंत्र प्रणाली संबंधित कठीण जाते.

अपंगत्वाचे 21 प्रकार कोणते तसेच त्यांचे लक्षणे याविषयी आपण संविस्तर माहिती पहिली. 

उत्तर लिहिले · 22/6/2022
कर्म · 48555
0
वृत्तलेखाला इंग्रजीमध्ये फिचर रायटिंग  म्हणतात.
उत्तर लिहिले · 18/2/2022
कर्म · 25790