Topic icon

दिग्दर्शक

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
3
श्री. पितांबर काळे हे मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी सुमारे १५ मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांचे मूळ आडनाव कालेल आहे आणि ते मुळात म्हसवड जवळील ता. माण येथील वळई गावचे आहेत.

इरसाल कार्टी (१९८७) या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.  त्यांनी हिरवा चुडा सुवासिनीचा (१९९५), स्वामी माझे दैवत (२००७), गोंद्या मारतंय तंगड (२००८), उमंग (२०१०) आणि शेगावचा योगी गजानन अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले.  १५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी या ओम पुरी यांच्या मराठी चित्रपटाला दिग्दर्शित केले.  काळे यांनी दिगंबर नाईक, किशोर नंदलास्कर आणि प्रेमा किरण असलेले गाव थोर पुढारी चोर (२०१७) चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.
उत्तर लिहिले · 31/12/2020
कर्म · 61500
7
चित्रपटाचा दिग्दर्शक हा चित्रपटाचा सर्वेसर्वा असतो. त्याच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विभागातील कलाकार आणि तंत्रज्ञ एकत्रपणे काम करतात. दिग्दर्शकावर कथासूत्र तयार करणे, पटकथा लेखकासोबत बसून पटकथा तयार करणे, सिनेमॅटोग्राफर, कलादिग्दर्शका सोबत चर्चा करून कथेचा दृश्य परिणाम साकारण्यासाठी योग्य ती तयारी करून मग त्यापद्धतीने चित्रीकरण पूर्ण करणे इ. कामाची जबाबदारी असते. दिग्दर्शकाला संगीत, नृत्य, ध्वनी, ग्राफिक्स आणि स्पेशल इफेक्ट्स इ. संबंधित कलाकार आणि तंत्रज्ञांशी चर्चा करून अंतिम निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे दिग्दर्शकाचे काम अतिशय आव्हानात्मक असते, त्याला सर्वच विभागांच्या कार्यप्रणालीची माहिती असणे गरजेचे असते.
उत्तर लिहिले · 16/2/2019
कर्म · 890