1
महानगरपालिकेच्या अध्यक्ष्याला  महापौर म्हणतात. महानगरपालिकेचा अध्यक्ष हा निवडून आणला जातो. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारणे, हे त्याचे मुख्य काम असून महानगरपालिकेचे कुठलेही दफ्तर वा माहिती मागविण्याचा त्याला अधिकार आहे. महानगरपालिकेच्या या कामकाजाविषयी निर्णय घेणे, अंदाजपत्रक मंजूर करणे, दरमहा रुपये ५०० पेक्षा अधिक पगार असलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे वगैरे कामे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची असतात. महानगरपालिका सदस्यांना नगरसेवक म्हणतात. त्यांना दरमहा विशिष्ट मानधन दिले जाते.
उत्तर लिहिले · 18/8/2022
कर्म · 44215